हमासच्या सदस्यांचा आता तुर्कीत आश्रय

19 Nov 2024 12:40:45
Hamas Members

तेल अवीव : हमासचे वरिष्ठ सदस्य तुर्किये येथे उपस्थित असल्याची बातमी माध्यमांतून देण्यात आली आहे. इस्रायलच्या सरकारी टीव्हीने रविवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी ही माहिती दिली. कतारने हमासला ( Hamas ) आपल्या हद्दीतून हुसकावून लावण्यासाठी पाऊले उचलल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. तथापि, तुर्कियेतील हमास नेत्यांची उपस्थिती आणि कतारमधून त्यांच्या कथित हकालपट्टीच्या बातम्यांचा संबंध आहे की नाही, हे स्पष्ट होऊ शकले नाही. इस्रायलमधील माध्यमाच्या वृत्तानुसार, कतारने हमासला सांगितले होते की, कतारमध्ये हा बदल अमेरिकेच्या दबावानंतर झाला आहे. युरोपियन युनियन आणि इस्रायलसारख्या देशांचा आंतरराष्ट्रीय पाठिंबा असूनही कतारने हमासला ‘दहशतवादी संघटना’ म्हणून मान्यता देण्यास नकार दिल्याने, एर्दोगान यांनी मार्चमध्ये हमासला तुर्कीच्या समर्थनाचा पुनरुच्चार केला. इस्रायलमधील तुर्की दूतावासाने आपला ध्वज अर्ध्यावर फडकावून हमासचे राजकीय ब्युरो नेते इस्माईल हनिया यांच्या मृत्यूनंतर ऑगस्टमध्ये तुर्कीने राष्ट्रीय शोक घोषित केला होता.

Powered By Sangraha 9.0