औरंग्या फॅन क्लबकडे लोकांची पाठ! उबाठांना मिळतेय रिकाम्या खुर्च्यांची साथ!

18 Nov 2024 12:34:41
 
UBT
 
मुंबई : मुंबईतील बीकेसी येथे रविवार, १८ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. या सभेतील खुर्च्या रिकाम्या असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. तसेच यासंबंधीचा एक व्हिडीओही भाजपने शेअर केला आहे. त्यानंतर यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली.
 
हे वाचलंत का? -  जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार!
 
चित्रा वाघ म्हणाल्या की, "उद्धव ठाकरे तुम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि संस्कार सोडले. सत्तेसाठी हिंदुत्व सोडले. शिवसैनिकांचा विचार केला नाही आणि आता तर थेट औरंग्या फॅन क्लबचे मेंबर झालात. त्यामुळेच जनाब ठाकरेंची साथ जनतेने सोडली," असे त्या म्हणाल्या.
 
 
 
Powered By Sangraha 9.0