‘व्होट जिहाद’च्या आवाहनाला सडेतोड उत्तर द्या!

17 Nov 2024 15:46:00
Devendra Fadanvis

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस जाती-जातींमध्ये लोकांना विभाजित करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच अल्पसंख्याकांची एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी महाविकास आघाडीकडून धार्मिक धृवीकरणावर भर दिला जात आहे. त्यातच ‘ऑल इंडिया मुस्लीम लॉ बोर्डा’चा प्रवक्ता सज्जाद नोमाणीने ‘व्होट जिहाद’च्या ( Vote Jihad ) आवाहन केल्याने, या आवाहनाला सडेतोड उत्तर

बहुसंख्य मतांना देखील एकत्र यावे लागेल!

उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाविकास आघाडीला इशारा दिला. ते म्हणाले की, “ जर तुम्हाला वाटत असेल की मुठभर लोकांच्या मतांवर तुम्ही निवडून येऊ शकतात, तर बहुसंख्य मतांना देखील एकत्र यावेच लागेल.” आज नोमणी यांचा दुसरा व्हिडिओ आला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान केलेल्या मुस्लिमांना शोधून, त्यांना वाळीत टाकण्याचे आवाहन केले आहे. त्यांचे दाणा पण बंद करण्याचे आवाहन केले आहे. मात्र कायम धर्मनिरपेक्षाची भाषा करणारे त्याबद्दल काहीही बोलत नाहीत. याला आम्ही योग्य उत्तर देऊ, असे फडणवीस म्हणाले.

आघाडीकडे मुद्दाच नाही

काँग्रेस जनतेला जाती- जातींमध्ये विभागण्याचा प्रयत्न करत आहे, तर महाविकास आघाडी मुस्लिम समाजामध्ये पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणुकीत त्यांच्याकडे मुद्दाच नसल्याने केवळ जातीयवाद करून ‘व्होट जिहाद’ करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Powered By Sangraha 9.0