
कोलकता : पश्चिम बंगाल मध्ये सध्या एका वेगळ्याच घोटाळ्याने सगळ्यांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. विद्यार्थांना, उच्च शिक्षणासाठी देण्यात आलेल्या टॅबलेटच्या पैशांमध्ये फेरफार होत असून विद्यार्थांच्या बँक खात्याऐवजी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये हे पैसे जमा होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या संदर्भात कोलकाता पोलीस आणि विशेष तपास पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी तपास केला असून वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.
पश्चिम बंगालच्या 'तरुणर स्वप्नो' योजने संबंधित सायबर घोटाळाला उघडकीस आला आहे यामध्ये १० व १२ वीच्या विद्यार्थ्यांना टॅबलेट खरेदीसाठी १०,००० हजार रूपये दिले गेले होते. सदर रकम बँक खात्यात जमा करण्यासाठी एका विशिष्ठ पोर्टल वर बँक खात्याचा नंबर अपलोड करावा लागत असे. हाच नंबर हेरून काही जणांनी हा घोटाळा केला. यामुळेच १६ लाख लाभार्थ्यांपैकी १,९११ विद्यार्थीांना लक्ष्य केले गेले आहे. पश्चिम बंगाल पोलिसांनी या फसवणुकीप्रकरणी ९३ एफआयआर नोंदवले असून आता पर्यंत, ११ जणांना अटक केली आहे. कोलकाता येथे नोंदवलेल्या तक्रारींच्या तपासणीत असे आढळून आले की, बहुतेक प्रकरणांमध्ये, चोप्रा, इस्लामपूर आणि आसपासच्या भागातील रहिवाशांच्या बँक खात्यात पैसे गेले.
सायबर घोटाळ्यांमधला हा एक धक्कादायक प्रकार लोकांच्या समोर आला आहे. पूर्वी मध्यस्थांच्या माध्यमातून पैश्यांमध्ये जो फेरफार होत असे त्याला रोखण्यासाठी म्हणून थेट बँकांमध्ये पैसे पाठवण्याची योजना आखली गेली आहे. परंतु ममता दिदींच्या सरकार मध्ये यामध्ये देखील घोटाळा होत असेल तर ही चिंतेची बाब असल्याचे म्हटले जादत आहे.