मुंबई : भारतीय अर्थव्यवस्था वाढीचा चढता आलेख कायम असून मूडीजने विकास दराबाबत अंदाज वर्तविला आहे. विकास दर ७.२ टक्के राहील, असा अंदाज मूडीजने वर्तविला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताचा आर्थिक विकास सुरू राहील. विशेष म्हणजे मूडीजने दिलेला अंदाज रिझर्व्ह बँकेच्या अंदाजाशी समतुल्य आहे. २०२४-२५ मध्ये भारताचा जीडीपी वाढीचा दर ७.२ टक्के इतका असेल, असेही आरबीआयने म्हटले आहे.
हे वाचलंत का? -
पश्चीम बंगाल मध्ये 'टॅब स्कॅम'! विद्यार्थांचे पैसे लंपास
ग्लोबल रेटिंग एजन्सी 'मूडीज'ने मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्थेचा वेगवान विकास होण्याचा अंदाज वर्तविला आहे. २०२४ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ७.२ टक्के इतक्या वेगाने वाढ दर्शवेल. तसेच, अर्थव्यवस्थेत उच्च विकास दर राखण्याची ताकद असल्याचे मूडीजने म्हटले आहे.
त्याचबरोबर, आगामी काळात देशातील लोकांचा खपही वाढेल, असे सांगताना यामागे आगामी सणांचा हंगाम आहे, या काळात लोक जास्त खर्च करतील ज्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. मूडीजने २०२५-२६ आर्थिक वर्ष भारताचा जीडीपी वाढीचा दर अनुक्रमे ६.६ टक्के आणि ६.५ टक्के असा अंदाज वर्तवला आहे.