धक्कादायक! पाकिस्तानात हिंदू युवकावर गोळीबार

16 Nov 2024 17:03:24

 Hindu 
 
सिंध : पाकिस्तानात अल्पसंख्यांकांना लक्ष केले आहे. या घटनेत अल्पसंख्याक हिंदू राजेश कुमारची हत्या करण्यात आल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना घडली आहे. गरू नानक जयंतीनिमित्त जात असताना सिंध प्रांतातील लारकान येथे राजेश कुमार यांना वाटेत दरोडेखोरांनी गोळ्या घातल्या आहेत. लाहोरपासून ६० किमी अंतरावर असलेल्या पंजाब येथील प्रांतातील मननवाला ननकाना साहिब येथील रोडवर ही घटना घडली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, आता राजेश कुमार त्याचा मित्र आणि मेहुण्यासोबत कारमधून जात होते. बुधावारी रात्री १३ नोव्हेंबर २०२४ रोजी तीन सशस्त्र दरोडेखोरांनी त्यांची कार थांबवली आणि त्यांच्याकडील ४,५०,०० पाकिस्तानी रुपये आणि ड्रायव्हरने १०,००० रूपये लुटले आहेत. राजेश याने विरोध केला असता त्यावेळी राजेशवर गोळीबार करण्यात आला. त्याला गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल कऱण्यात आले. तेथे गुरूवारी १४ नोव्हेंबर २०२४ रोजी त्याचा मृत्यू झाला
.
या घटनेनंतर राजेशच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणाने पाकिस्तानातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यामुळे पाकिस्तानातील हिंदू समुदायाच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे.
 
राजेश कुमार यांची पाकिस्तानात हत्या झाल्यानंतर आता पाकिस्तानातील हिंदू, ख्रिश्चन, शीख यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
Powered By Sangraha 9.0