भाजपला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांवर बहिष्कार टाकण्याची भाषा!

16 Nov 2024 12:36:01
 
Kirit Somaiyya
 
मुंबई : मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सज्जाद नोमानी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांनी निवडणूक आयोगाकडे त्यांची तक्रार केली आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
 
 
 
सज्जाद नोमानी यांचे व्हिडीओ भाजपकडून ट्विट करण्यात आले आहे. यात त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर करत आमचा निशाणा केवळ महाराष्ट्र नसून दिल्ली आहे, असे विधान केले. यावरून सध्या चांगलेच राजकारण तापले आहे. दरम्यान, किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे मौलाना खलीलुर रहमान सज्जाद नोमानी यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे.
 
हे वाचलंत का? -  मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डवर बंदी आणून सज्जाद नोमानीला अटक करा!
 
मुस्लिमांचा धार्मिक भावना भडकावणे, द्वेषयुक्त भाषण करणे, ज्या मुसलमानाने भाजपचे समर्थन केले त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार घालण्याचे आवाहन करणे आणि वोट जिहाद आवाहन करणे, या सगळ्यामुळे सज्जाद नोमानी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0