ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा, तर अमिताभ बच्चन यांनी निम्रत कौरला पाठवलं पत्र, नेमकं प्रकरण काय?

15 Nov 2024 15:12:20

nimrat 
 
 
मुंबई : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांत चर्चेचा विषय ठरला आहे. या दरम्यान, अभिषेक बच्चनचे नाव निमरत कौर सोबत जोडण्यात आले. एकीकडे अभिषेक-ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात असताना दुसरीकडे अभिनेते अमिताभ बच्चन यांनी निमरत कौरला पत्र लिहिले आहे. हे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. नेटकऱ्यांनी या पत्राचा संबंध अभिषेक आणि निमरतच्या नात्याशी जोडला आहे.
 
अभिषेक बच्चन आणि निम्रत कौरने 'दसवी' चित्रपटात एकत्र काम केलं आहे. यामुळे अमिताभ बच्चन यांनी निम्रतचे कौतुक करणारे पत्र लिहिलं आहे. या पत्रात बिग बी यांनी लिहिलं की, "आपण या आधी भेटलो किंवा बोलो आहोत. मी वाईआरएफच्या कार्यक्रमात तुझ्या कॅडबरीच्या जाहिरातीच कौतुक केलं होत. तुझं 'दसवी' चित्रपटातील काम खूप उल्लेखनीय आहे. तुझे मनापासून कौतुक आणि खूप अभिनंदन..."
 

nimrat 
 
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांत कोणत्याही कार्यक्रमात अभिषेक-ऐश्वर्या एकत्र न दिसल्यामुळे त्यांच्यात नक्कीच काही ठिक नसल्याचे म्हटले जात आहे. आणि त्यात आता अमिताभ यांनी पत्रातून निमरतचे केलेले कौतुक अधिक शंका निर्माण करत आहेत.
 
 

nimrat 
Powered By Sangraha 9.0