काँग्रेससोबत युती केल्याचा प्रश्न विचारल्याने आदित्य ठाकरेंनी काढला मुलाखतीतून पळ

14 Nov 2024 12:33:26
 
Aditya Thackeray
 
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात आघाडी आणि युती यांच्यात लढत होत असताना अनेक उमेदवारांच्या माध्यमांवर मुलाखती होत आहेत. पत्रकार उमेदवारांना झालेल्या कामांविषयी विचारत आहेत. तर उमेदवारही कामाचा आढावा देत आहेत. अशातच आता वऱळी मतदारसंघाचे आमदार आणि उमेदवार आदित्य ठाकरे यांनी माध्यमाने विचारलेल्या एका प्रश्नवर भरसभेतून पळ काढला आहे.
 
आपण काँग्रेससोबत युती केल्यामुळे आपण आता काँग्रेसबाबत बोलत आहात, असे एका महिला पत्रकाराने उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधत असताना विचारले. त्यावर आदित्य ठाकरे यांनी महिला पत्रकारावर आक्रमक होत आपण भाजपच्या बाजूने बोलू नका, अशी आरेरावी करत आदित्य ठाकरे यांनी वक्तव्य करत पत्रकारावर मुजोरी केली आहे.
 
यावेळी बोलत असताना महिला पत्रकाराने आदित्य ठाकरे यांना पुन्हा काँग्रेसच्या युतीवरून विचारले असता, आदित्य ठाकरे यांचा पारा चढला आणि त्यांनी भर मुलाखत सोडून तिथून पळवाट काढली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0