डोंबिवली पश्चिमेस रविंद्र चव्हाण यांच्या प्रचारार्थ पदफेरीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

13 Nov 2024 18:58:29
Ravindra Chavan

डोंबिवली : डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रविंद्र चव्हाण ( Ravindra Chavan ) यांच्या प्रचारार्थ माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक विकास म्हात्रे यांनी काढलेल्या प्रचार पदफेरीस कुंभारखान पाडा, नवापाडा, गरिबाचा वाडा परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. भाजपा आणि महायुतीचा जयजयकार करत शेकाडो महिला - पुरुष कार्यकर्त्यांनी या प्रचार फेरीत उपस्थिती लावली.

निवडणुकीस अवघा एक आठवडा शिल्लक राहिला असल्याने प्रचाराचे वातावरण तापले आहे. डोंबिवलीत महायुतीचे रविंद्र चव्हाण आणि महाविकास आघाडीचे दिपेश म्हात्रे यांच्यात सरळ लढत आहे. आज च्या प्रचारफेरी मधे भाजपच्या नेत्या मनीषा राणे, डोंबिवली पश्चिम भाजपा सरचिटणीस दिलीप धुरी, शिवसेना शाखा क्रमांक ५० चे शाखा प्रमुख प्रताप पाटील, उप शाखा प्रमुख शरद पवार, शाखा क्रमांक ४९ शाखा प्रमुख सनी सुर्वे यांच्यासह महायुतीचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Powered By Sangraha 9.0