धक्कादायक! कॅनडामध्ये हिंदूंकडून मागितली पोलिसांनी खंडणी

13 Nov 2024 17:55:20

canada polis

ओटावा : कॅनडामधील हिंदू समाजला वेळोवेळी त्रास देण्याचा चंग तिथल्या सरकारने बांधला आहे की काय असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कॅनडा मधील हिंदू समाजातील लोकांना काही खलिस्तानी फुटीरतावादी लोकांकडून जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. अशातच, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या सरकार आणि पोलिसांवर आहे, त्या पोलिसांनीच आता सामान्य हिंदू नागरिकांकडून खंडणी मागण्याचे काम सुरू केले आहे. सुरक्षा हवी असेल, तर ७०,००० डॉलर्स द्या अशी मागणी या पोलिसांनी केली आहे.

कॅनडातील पोलिसांनी अशा रितीने हिंदू समाजाकडून खंडणीची मागणी केल्यानंतर, कॅनडा सरकारवर टिकेची झोड ऊठली आहे. कॅनडामधील हिंदूंच्या नागरी हक्कांची गळचेपी होत असल्याचा आरोप केला जातो आहे. समाजमाध्यामांशी संवाद साधताना कॅनडातील हिंदू नागरिकांनी सांगितले की " आम्ही सुद्धा इतरांप्रमाणे या देशाचे नागरिक आहोत. इथल्या व्यवस्थेनुसार आम्ही सुद्धा कर भरतो, मग आमच्यासोबतच असा दुजाभाव का केला जातो ? गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदूंचे कार्यक्रम रद्द करण्यासाठी, कॅनडा सरकारच्या प्रशासनावर खलिस्तानी गटांचा दबाव असल्याने हा सगळा प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे.

आयोध्येतील श्रीराम मंदिर उडवण्याची धमकी!
कॅनडातील जस्टीस फॉर सिख्स या संघटनेचा संस्थापक आणि कुख्यात खलिस्तानी फुटीरतावादी गुरपतवंत सिंग पन्नून याने आयोध्येतील श्रीराम मंदिर उडवण्याची धमकी दिली असून कॅनडामधील मंदिरं उडवण्याची धमकी सुद्धा दिली आहे. या बरोबर भारतीय दूतवासांबद्दल अशलाघ्य भाषेत टिका करत त्यांना सुद्धा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. कॅनडातील लक्ष्मी नारायण मंदिराचे अध्यक्ष सतीश शर्मा यांच्या घरावर झालेल्या गोळीबारासह गेल्या एका वर्षात हिंदू मंदिरांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले सुरू झाले.
 
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिरावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. असल्या भ्याड हल्ल्याने भारताचा निश्चय कधीच डळमळीत होणार नाही अश्या शब्दात मोदी यांनी कॅनडा सरकारला खडे बोल सुनावले.

 
Powered By Sangraha 9.0