‘साईक्स’चे भारतीयत्व; पक्ष्यांना हिंदू देवतांची नावे देणाऱ्या ब्रिटीश पक्षीशास्त्रज्ञांची कथा

    11-Nov-2024
Total Views | 155
Colonel William Henry Sykes

 
भारतामध्ये आढळणार्‍या काही पक्ष्यांची नावे ही ब्रिटिश सैन्यदलातील अधिकारी कर्नल साईक्सच्या नावावरुन देण्यात आली आहेत (Colonel William Henry Sykes). भारतीय पक्ष्यांवर अभ्यास करणार्‍या बर्‍याच ब्रिटिश पक्षीशास्त्रज्ञांपूर्वी आपल्याला कर्नल साईक्स यांचे भारतीय पक्षीसंशोधनामधील योगदान जाणून घेणे आवश्यक आहे (Colonel William Henry Sykes). असे का, तर कर्नल साईक्सने आपल्या पक्षीसंशोधनकार्यात जपलेले भारतीयत्व (Colonel William Henry Sykes). या ब्रिटिश शास्त्रज्ञाने आपल्या संशोधनामध्ये भारतीयत्व जपून इथल्या सांस्कृतिक आणि धार्मिक भावनांचा आदर राखला. कर्नल विल्यम हेन्नी साईक्स यांचा जीवनकाळ सन १७९० ते १८७२ एवढा होता. भारतामध्ये ब्रिटिश सैन्यदलात ते काम करत होते. याशिवाय ते राजकारणी, पक्षीशास्त्रज्ञ आणि इंडोलॉजिस्ट म्हणजेच भारतविद्या विषयाचे अभ्यासक होते. १८३२ मध्ये ‘प्रोसिडिंग ऑफ द झूलॉजिकल सोसायटी’मध्ये त्यांनी लिहिलेले दख्खनचे पक्षी आणि सस्तन प्राण्यांचे कॅटलॉग प्रकाशित झाले. ज्यामध्ये त्यांनी ‘ढोकरी’ म्हणजे ‘इंडियन पॉण्ड हेरॉन’ या बगळ्यासह विज्ञानासाठी नवीन असलेल्या पक्ष्यांच्या ५६ प्रजातींचे वर्णन केले होते. त्यांच्या दख्खन प्रदेशात आढळणार्‍या पक्ष्यांच्या यादीत २५६ प्रजातींचा समावेश होता. त्यांच्या या योगदानामुळेच साईक्स तुरेवाला चंडोल (Sykes's Crested Lark), साईक्सचा रातवा (Sykes's Nightjar), साईक्सचा वटवट्या (Sykes's Warbler) अशा काही पक्ष्यांना त्यांचे नाव देण्यात आले.
 
 
 
कर्नल साईक्स हे भारतविद्या विषयाचे अभ्यासक होते. त्यांनी हिंदू धार्मिक देवता आणि पौराणिक कथांचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांच्यावर हिंदू धर्माचा प्रभाव पडला. या प्रभावाचे प्रतिबिंब त्यांनी केलेल्या पक्ष्यांच्या संशोधनामध्ये उमटलेले दिसते. पक्ष्यांच्या नव्या प्रजातींचा उलगडा करुन त्यांचे नामकरण करताना साईक्स यांनी आवर्जून हिंदू धार्मिक प्रतिमांचे त्यामध्ये कसे प्रतिबिंब उमटेल, याचा प्रकर्षाने विचार केला. पक्ष्याचे शास्त्रीय नाव ठेवताना त्यांनी त्या पक्ष्याच्या कुळाचे नाव हे ग्रीक पौराणिक कथांमधील प्रतिमांच्या आधारे, तर पुढील मूळ नाव हे हिंदू धार्मिक प्रतिमांच्या आधारे ठेवले. उदाहरणार्थ शहर आणि ग्रामीण भागात सहजपणे दिसणार्‍या ठिपकेवाला पिंगळा (Spotted Owlet) या पक्ष्याचा शोध कर्नल साईक्स यांनी लावला. या पक्ष्याचे शास्त्रीय नामकरण त्यांनी ‘अथिन ब्रम्हा’ असे केले. यामधील ‘अथिन’ ही ग्रीक देवता असून ‘ब्रम्हा’ ही हिंदू देवता आहे. याचप्रमाणे काळा बुलबुलचे (Black Bulbul) शास्त्रीय नाव ‘हायप्सीपेट्स गणेशा’, ब्राम्हणी घारीचे नाव (Brahminy Kite) ‘हलियास्तुर गरुडा’, काळ्या घारीचे नाव (Black Kite) ‘मिल्युएस एम. गोविंदा’, साईक्सचा तुरेवाला चंडोलचे नाव (Sykes's Lark) ‘गॅलेरिडा देवा’, तपकिरी वन घुबडाचे नाव (Brown Wood Owl) ‘स्ट्रिक्स इंद्राणी’ असे केले. साईक्सच्या या भारतीयत्वामुळे तो इतर ब्रिटिश पक्षीशास्त्रज्ञांपेक्षा उजवा ठरला.

- आदेश शिवकर
 शब्दांकन - अक्षय मांडवकर
 (लेखक पक्षीतज्ज्ञ आहेत.)
अग्रलेख
जरुर वाचा
क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे नवी मुंबईसाठी पुनर्विकास प्रदर्शनाचे आयोजन

क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे नवी मुंबईसाठी पुनर्विकास प्रदर्शनाचे आयोजन

नवी मुंबई आणि रायगड भागातील गृहनिर्माण क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या पहिल्याच उपक्रमात चाळीस वर्षांखालील तरुण रिअल इस्टेट डेव्हलपर्सची संघटना, क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे सिडको Exhibition सेंटर रविवार, २९ जून २०२५ रोजी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 8:00 वाजेपर्यंत मेगा पुनर्विकास प्रदर्शन योजले आहे. आज नवी मुंबईतील हॉटेल ताज विवांता येथे रिअल इस्टेट उद्योगातील वरिष्ठ नेते, क्रेडाई एमसीएचआय युथचे पदाधिकारी आणि माध्यमांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली...

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील तासिका निदेशकांना न्याय

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील तासिका निदेशकांना न्याय

ज्या शिल्प निदेशकांनी ५ वर्षांपेक्षा जास्त काळ विभागामध्ये कार्य केले आहे, त्यांची परीक्षा घेऊन उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात यावे असे लेखी निर्देश कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालकांना दिले. माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी तासिका निदेशकांना नियमित करण्याबाबत कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांना पत्राद्वारे विनंती केली होती. यानंतर मंत्री श्री. लोढा यांनी पत्राची तातडीने दखल घेत, संबंधित अधिकाऱ्यांना सकारात्मक चर्चा करून योग्य कार्यवाही..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121