कॅनडात झालेल्या हिंदूंवरील हल्ल्याप्रकरणात खलिस्तानी आरोपी गजाआड

10 Nov 2024 16:13:33
 
इंद्रजीत गोसल
 
नवी दिल्ली : काही दिवसांआधी कॅनडातील ब्रॅम्प्टन येथे झालेल्या हिंदू मंदिरावरील हल्लाप्रकरणातील चौथा आरोपीला अटक करण्यात आली आहे. तो खलिस्तानी संघटनेचा असल्याची माहिती देण्यात आली आहे. इंद्रजीत गोसल असे त्याचे नाव असून गुरूपवंत सिंह यांचा तो युवक निकटवर्ती आहे.
 
याप्रकरणात आता पोलिसांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, इंद्रजीत गोसलने झालेल्या मंदिरावरील हल्ल्याची योजना आखली असून हा हल्ला टोरंटो येथे घडला होता. शिख फॉर जस्टिसच तो उजवा हात असल्याची चर्चा आहे. त्याला ८ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आले होते. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. त्याला आता पुढील तारखेसाठी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते.
 
याप्रकरणात आता पोलिसांनी एक विशिष्ट पथक स्थापन केले आहे. जे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. ४ नोव्हेंबर रोजी हिंदूच्या अस्मितेवर हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. कॅनडा सरकारला खडेबोल सुनावले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0