वॉशिंग्टन डीसी : अमेरीकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि कमला हॅरीस यांच्या विरोधात निवडणूकीत दंड थोपटून उभे राहिलेले डोन्लाड ट्रम्प यांनी १ नोव्हेंबर रोजी अमेरीकेतील हिंदू बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या सोबतच, निवडून आल्यास मोदी यांच्या सोबतचे संबंध अजून दृढ करू असे सुद्धा ट्रम्प म्हणाले. या दरम्यान त्यांनी भारताबरोबर असलेल्या समृद्ध नातेसंबंधांवर त्यांनी प्रकाश टाकला.
डाव्यांवर घणाघात
अमेरीकेतील हिंदूंचे आम्ही कमला हॅरीस यांच्या डाव्या धर्मविरोधी अजेंड्या पासून रक्षण करू असे सुद्धा ट्रम्प म्हणाले. जगाच्या पाठीवर असलेल्या हिंदू समाजाकडे आणि अमेरीकेतील हिंदू नागरिकांकडे कमला आणि बायडेन यांनी लक्ष्य दिले नाही. अमेरीकेतील दक्षिण सीमा असो किंवा, इस्रायल आणि युक्रेन सारख्या ठिकाणी होणारे युद्ध असो, बायडेन यांचे सरकार हे सगळे थांबण्यात अपयशी ठरले आहे. परंतु आम्ही या सगळ्या परिस्थीतीचा कायापालट करू. अमेरीकेला पुन्हा एकदा शक्तीशाली बनवू आणि साम्यर्थाने शांताता प्रस्थापित करू.
बांगलादेश वरून चिंता व्यक्त
" बांगलादेश मध्ये सुरू असलेल्या हिंदूंवर अत्याचाराचा मी निषेध करतो. बांगलादेश मध्ये सध्या केवळ लूटमार सुरू आहे. जिकडे तिकडे अराजकता माजली आहे. मी जर सत्तेत असतो तर ही परिस्थीती उद्भवली नसती. कमला आणि जो बायडन यांचे सरकार ही अराजकता थांबण्यत अपयशी ठरले आहेत. कमला हॅरीस यांच्या डाव्या अजेंड्यावर निशाणा साधत ट्रम्प म्हणाले " कमला हॅरीस तुमच्याकडून कर वसुली करेल आणि छोटे उद्योग नष्ट करेल. दुसऱ्या बाजूला तुम्ही जर माझ्यासोबत आलात, तर आपण सगळे मिळून अमेरीकेला प्रगत राष्ट्र बनवू.
अमेरीकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका येत्या ४ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहेत. ज्यात कोट्यावधी अमेरीकन भाग घेणार आहेत. महासत्तेच्या या निवडणुकांकडे अवघ्या जगाचे लक्ष्य लागले आहे.