"मनोज जरांगे हे अधुनिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद" : मुस्लिम मौलानांनी तोडले अकलेचे तारे

01 Nov 2024 13:06:03
  
Manoj Jarange
 
मुंबई : मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वक्फ बोर्डाचे सज्जद नेमानी यांनी ३१ ऑक्टोबर रोजी भेट घेतली. येत्या विधानसभा निवडणुकीला मनोज जरांगे पाटील यांनी सज्जद नेमानी यांची भेट घेत मतांची गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांनी बोलत असताना मनोज जरांगे हे अधुनिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद असे बेजबाबदार वक्तव्य करत मुस्लिम मौलानांनी गरळ ओकली आहे. 
 
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचे अमिष दाखवत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांसाठी कट्टरपंथींशी हातमिळवणी केली आहे. एका बाजूचा विचार केल्यास सज्जद नोमानी यांनी हिंदूंविरोधात अनेकदा गरळ ओकली आहे. आता मतांसाठी मनोज जरांगे हे कट्टरपंथींच्या मांडीला मांडीला लावून बसले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगेंनी आंदोलन-उपोषण केलं. मात्र आता सज्जद नोमानी यांच्याशी हातमिळवणी करत हिंदूंमध्ये फूट पडल्याची चिंता निर्माण झाली आहे.
 
सज्जद नोमानी यांनी काही दिवसांआधी हिंदूंविरोधात गरळ ओकली होती. अनेक मुस्लिम युवती या हिंदूंसोबत गेल्या आणि धर्मांतरण केल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी हिंदूंधर्माविरोधात आरोप व्यक्त केला आहे. एवढेच नाहीतर त्यांनी मनोज जरांगे पाटील हे अधुनिक काळातील असल्याचे बेजबाबदार वक्तव्य केले आहे. यामुळे काही विशिष्ट समाजात तेढ निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. 
 
 
 
Powered By Sangraha 9.0