मुंबई : आरबीआयने रेपो रेट कायम ठेवल्यानंतर रिव्हर्स रेपोरेटबद्दल जाणून घेऊयात. रिव्हर्स रेपोरेट हा अगदी रेपो रेटच्या विरुध्द असतो. म्हणजेच बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे जमा केलेल्या ठेवींवर मिळणारे व्याज म्हणजे रिव्हर्स रेपो रेट होय. रिव्हर्स रेपो रेटच्या माध्यमातून मध्यवर्ती बँकेकडे जमा केलेल्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजास रिव्हर्स रेपो रेट असे म्हटले जाते.
विशेष म्हणजे रिव्हर्स रेपो रेटच्या माध्यमातून बाजारांमध्ये पैशांची तलरता(लिक्विडिटी) कायम ठेवण्यास मदत मिळते. एकूणातच मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चलन उपलब्ध झाल्यास रिव्हर्स रेपो रेट वाढविण्याचा विचार रिझर्व्ह बँक करत असते. नुकत्याच झालेल्या पतधोरण समितीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(आरबीआय)कडून रेपोरेट स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत रेपोरेट ६.५० टक्के इतका ठेवला आहे.
व्यावसायिक बँकांना दररोजच्या आर्थिक व्यवहारांकरिता मोठ्या रकमेची गरज असते. या गरजेच्या पूर्ततेसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(आरबीआय) अल्प मुदतीसाठी बँकांना कर्जपुरवठा करते. याच अल्प मुदतीकरिता असलेल्या कर्जपुरवठ्यावर आरबीआय व्याजदर आकारते यालाच रेपोरेट किंवा रेपो दर असे म्हटले जाते.