मुंबई : सलग दहाव्यांदा रेपोरेट कायम ठेवत सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(आरबीआय)ने कायम ठेवलेला रेपोरेट म्हणजे नेमकं काय, याचा तुमच्या कर्जावर कसा परिणाम होतो, याबाबत जाणून घेऊयात. आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर रेपोरेटची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.
हे वाचलंत का? -
सलग दहाव्यांदा रेपोरेट 'जैसे थे'च! जीडीपीत ७.२ टक्के वाढीचा अंदाज
दरम्यान, व्यावसायिक बँकांना दररोजच्या आर्थिक व्यवहारांकरिता मोठ्या रकमेची गरज असते. या गरजेच्या पूर्ततेसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(आरबीआय) अल्प मुदतीसाठी बँकांना कर्जपुरवठा करते. याच अल्प मुदतीकरिता असलेल्या कर्जपुरवठ्यावर आरबीआय व्याजदर आकारते यालाच रेपोरेट किंवा रेपो दर असे म्हटले जाते.
याचा परिणाम म्हणजे आरबीआयकडून व्यावसायिक बँकांना कमी व्याजदरात कर्ज मिळत असेल तर बँका खातेधारकांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देते. उलटपक्षी मध्यवर्ती बँकेने व्याजदर वाढविले की, व्यावसायिक बँकांना अधिक व्याजदराने आपल्या खातेधारकांना कर्ज पुरविते. त्यामुळे आरबीआयच्या पतधोरण समितीच्या रेपोरेट निर्णयाकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले असते.