मुंबई : देशभरात नव्या कर्मचारी राज्य विमा महामंडळ(ईएसआयसी) वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना करणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केली. पंतप्रधानांच्या येत्या ५ वर्षांत वैद्यकीय अभ्यासक्रमात ७५ हजार नव्या जागांची निर्मिती या घोषणेच्या अनुषंगाने देशभरात नवीन १० ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना केली जाणार आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे ईएसआयसी मुख्यालयात १९४वी बैठक पार पडली. पायाभूत सुविधा तसेच ईएसआयसीकरून देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधा आणखी वाढवण्याच्या दृष्टीने या बैठकीत ईएसआय महामंडळासाठीच्या अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
१० नव्या ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालये पुढीलप्रमाणे :-
अंधेरी (महाराष्ट्र),बसाईदरापूर(दिल्ली), गुवाहाटी-बेल्तोला (आसाम), इंदोर (मध्य प्रदेश),जयपूर (राजस्थान), लुधियाना (पंजाब), नरोडा-बापूनगर(गुजरात), नोईडा आणि वाराणसी (उत्तर प्रदेश) तसेच रांची (झारखंड) अशा १० ठिकाणी नव्या ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी करण्यास महामंडळाने तत्वतः मान्यता दिली आहे.