नालासोपाऱ्यात नवरात्रौत्सव साजरा करण्यास मुस्लिमांचा विरोध

09 Oct 2024 14:33:00
 
Navratri Festival
 
नालासोपारा : पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे एका सोसायटीत कट्टरपंथींनी नवरात्रौत्सवाला (Navratri Festival) विरोध दर्शवला आहे. ऑरेंज सोसायटी असे त्या सोसायटीचे नाव असून त्यांनी हिंदू सणाला विरोध दर्शवला आहे. या सोसायटीत हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समाजाचे नागरिक आहेत. या सोसायटीच्या आवारात मुस्लिम सामाजाच्या लोकांनी अवैध मशीद बांधण्याचे काम केले. याला हिंदूंनी विरोध केला आहे. ते म्हणाले की, अवैध मशीद सोसायटीच्या आवारात चालते मग आमचे सण आणि देवदेवतांच्या पूजेला विरोध का दर्शवता?
 
दरम्यान, ऑरेंज सोसायटीत दुर्गापूजेसाठी हिंदू एकवटले असता, त्यांना मुस्लिमांनी पूजा करण्यापासून विरोध दर्शवला. त्यावेळी सर्व हिंदू एकत्रित झाल्यानंतर यावेळी घटनास्थळी पोलीस तैनात झाले आणि त्यांनी हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला होता.
 
 
 
याच पालघर येथे काही वर्षांआधी दोन हिंदू साधूंची हत्या झाली होती. याच शहरात आता नवरात्रौत्सवाला मुस्लिम विरोध करत आहेत. याचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यांनी पूजास्थळी लोखंडी वस्तू रचून ठेवल्या.
 
 त्यावेळी हिंदू समुदायातील लोकांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती. यावेळी एका सोसायटीतील हिंदू व्यक्तीने आपला देश असून आपलेच सण साजरे करायला आपल्याला परवानगी मागावी लागत आहे. ही दुख:द घटना आहे. याप्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
 
Powered By Sangraha 9.0