बेरूत : इस्त्रायलने हिजबुल्लाहवर अनेक हल्ले केले आहेत. या हल्ल्यात एकूण ५० जणं ठार झाली आहेत अशी माहिती आहे. मृतांमध्ये हिजबुल्लाहचे साऊथ कमांडर आणि ६ वरिष्ठ कमांडर हल्ल्यात ठार झाले आहेत. गेल्या १५ दिवसांमध्ये लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहवर हल्ले केल्यानंतर हिजबुल्लाहची सत्य परिस्थिती समोर आली.
गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायलने हिजबुल्लाहवर हल्ले करणे सुरूच ठेवले आहे. हिजबुल्लाहच्या कमांडर सेंटरवर इस्त्रायलने केलेल्या हल्ल्याचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय पातळीवर दिसत आहेत. याचा परिणाम हा भाराताच्या बाजारपेठेवर झाला असून शेअर मार्केट घसरले आहे.
तर दुसरीकडे हिजबुल्लाहकडून इराण इस्त्रायलविरोधात लढेल अशी शक्यता नाकारता येणार नाही. यामुळे इराणकडे असलेला तेलसाठा भारताला आयात करण्यासाठी एकप्रकारे कोडे पडल्यासारखेच आहे. यामुळे इराण हिजबुल्लाहचा विरूद्ध इस्त्रायल युद्धामुळे भारताच्या वस्तू खरेदी विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.