आरबीआयची मोठी कारवाई, राज्यातल्या सहकारी बँकांवर कारवाईचा बडगा!

08 Oct 2024 20:41:35
rbi imposes monetary penalty


मुंबई :   
 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(आरबीआय)ने राज्यातील चार सहकारी बँकांना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक, कोयना सहकारी बँक लिमिटेड या बँकांवर आरबीआयने दंड आकारला आहे.

दरम्यान, मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकांवर कारवाई करताना एका वर्षापेक्षा जास्त काळ कोणतेही कामकाज झाले नाही, दंडात्मक शुल्क लादण्याबद्दल सूचित करण्यात अयशस्वी झाले असा ठपका ठेवत ३ लाख रुपये दंड आकारला आहे. तसेच, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांना प्रत्येकी २ लाख रुपये दंडात्मक कारवाई केली.

नातेवाईकांना, संबंधितांना कर्ज आणि अॅडव्हान्स यामुळे बँकेवर कारवाई करण्यात आली आहे. तर बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ४६(४)(i) आणि कलम ४७ए(१)(सी) अंतर्गत प्रदान केलेल्या निहित अधिकारांचा वापर करून आरबीआयकडून दंड ठोठावण्यात आला आहे.





Powered By Sangraha 9.0