जातीवाद हरला आणि विकास जिंकला! हरियाणा निकालावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

08 Oct 2024 19:16:05
 
Shinde
 
मुंबई : जातीवाद हरला आणि विकास जिंकला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हरियाणा विधानसभेच्या निकालावर दिली आहे. हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणूकांचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. दरम्यान, हरियाणामध्ये भाजपने विजय मिळवला आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "डबल इंजिन सरकारची विजयी दौड सुरु असून जातीवाद हरला आणि विकास जिंकला आहे. हरियाणातील जनतेने सलग तिसऱ्यांदा डबल इंजिन सरकारवर विश्वास दाखवला आहे," असे म्हणत त्यांनी या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे अभिनंदन केले.
 
हे वाचलंत का? -  महाराष्ट्रात हरियाणातील विजयाची पुनरावृत्ती होणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास
 
"या सर्वांच्या अथक परिश्रमामुळे त्यांच्या विरोधकांच्या सर्व स्वप्नांचा चुराडा झाला आहे. हरियाणातील जनतेने काँग्रेसच्या अत्यंत बनावट विधानाला महत्त्व न देता भारतीय जनता पक्षाची विश्वासार्हता निवडली आहे. महाराष्ट्रातील जनताही अशा खोट्या कथनांच्या फंदात पडणार नाही आणि डबल इंजिन सरकारची ही विकास यात्रा महाराष्ट्रातही सुरूच राहील," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0