नवी दिल्ली, दि. ५ : (Vishva Hindu Parishad) हिंदूंचे सण आणि कुंभमेळ्यासारख्या धार्मिक कार्यक्रमांचे पावित्र्य राखण्यासाठी संपूर्ण हिंदू समाज कटिबद्ध आहे. या घटनांमध्ये व्यत्यय निर्माण करणाऱ्यांविरोधात शासन, प्रशासन आणि समाजाला सतर्क राहावे लागणार आहे. सण आणि धार्मिक कार्यक्रमांना लक्ष्य करणे खपवून घेणार नाही, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) केंद्रीय संयुक्त सरचिटणीस डॉ.सुरेंद्र जैन यांनी सोमवारी केले आहे.
दांडिया नृत्य हा दुर्गा देवीच्या उपासनेचा अनोखा कार्यक्रम आहे. हा एक पूर्णपणे धार्मिक कार्यक्रम असून त्यात केवळ दुर्गा देवीला समर्पित असलेलेच भाग घेतात. दुर्दैवाने, विकृत मानसिकतेने ग्रासलेले जिहादी आपल्या घाणेरड्या हेतूने दांडिया कार्यक्रमांमध्ये प्रवेश करू लागले आहेत. भाग्यनगर (हैदराबाद) येथील दांडिया उत्सवामध्ये एका जिहादी इर्शाद खानने अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी विरोध केल्यावर त्याने तेथून पळ काढला, मात्र कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मात्र, अशाप्रकारे हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांना लक्ष्य करणे खपवून घेतले जाणार नसल्याचे डॉ. जैन म्हणाले.
ओवेसी यांच्यासारख्या कट्टरवादी नेत्यांच्या चिथावणीवरून जिहादी कुंभाच्या पवित्र सोहळ्याचे पावित्र्य भंग करण्याची एकही संधी सोडणार नाहीत, असेही डॉ. जैन यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, त्यामुळे कुंभमेळ्यात जिहादींच्या प्रवेशावर बंदी घालण्याची संतांनी केलेली मागणी अगदी रास्त आहे. आपल्या श्रद्धांच्या पावित्र्याचे रक्षण करण्याचा आपला घटनात्मक अधिकारही आपण वापरू शकत नाही का, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतो. जिहादी विचारसरणीच्या घटकांनी आपली कृत्ये सोडली तरच हिंदू समाज सहअस्तित्वाविषयी विचार करेल, असेही डॉ. जैन यांनी नमूद केले आहे.