तुमच्या कर्जाचा ईएमआय कमी होणार?; रेपो रेटसह किरकोळ महागाई दर चर्चेत!

07 Oct 2024 12:12:48
rbi-mpc-meet-monetary-policy-committee-meeting-started


मुंबई :   रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(आरबीआय)चे डेप्युटी गव्हर्नर एम. राजेश्वर राव यांना एक वर्षाची मुदतवाढ दिल्यानंतर आजपासून पतधोरण समितीची बैठक सुरू झाली आहे. पतधोरण समितीचे चेअरमन अर्थात आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास तीन दिवसीय बैठकीनंतर दिे. ०९ ऑक्टोबरला समितीचा निकाल जाहीर करतील.


हे वाचलंत का? -    सणासुदीच्या काळात गुंतवणूकदारांना मोठी संधी; बाजारात आयपीओंची तेजी!


दरम्यान, पतधोरण समितीच्या बैठकीत आरबीआय काय धोरण ठरविणार याकडे गुंतवणूकदारांसह अर्थविश्वाचे लक्ष लागले आहे. समितीकडून व्याजदर कपातीची शक्यता कमीच असून किरकोळ महागाई अजूनही चिंतेचा विषय आहे. यासंदर्भात आरबीआयकडून कोणते पावले उचलण्यात येतात, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

आरबीआयने फेब्रुवारी २०२३ पासून रेपोदरात कुठलाही बदल केला नसून आजच्या बैठकीत रेपो दरता कपात होण्याची शक्यता नाही. इराण-इस्त्रायल यांच्यातील संघर्षाचा परिणाम जागतिक बाजारावर दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर मध्य-पूर्वेतील संकटाचे विपरीत परिणाम कच्च्या तेलावर आणि वस्तूंच्या किमतींवर होत आहेत. या सगळ्या अस्थिरतेचा विचार या पतधोरण समितीच्या बैठकीत केला जाण्याची शक्यता आहे.

जाणकारांच्या माहितीनुसार, इतर विकसित देशांच्या केंद्रीय बँकांच्या धोरणाचे अनुकरण आरबीआय करणार नाही. या बँकांनी व्याजदरात कपात केली आहे. उलटपक्षी आरबीआय रेपो रेट स्थिर ठेवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने पतधोरण समितीमध्ये बाह्य सदस्यांची नियुक्ती केली असून त्यांचा सहभाग या बैठकीत असणार आहे.




Powered By Sangraha 9.0