मुंबई, दि.७ : ‘दै. मुंबई तरुण भारत’ आणि ‘महाएमटीबी’ आयोजित ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ (एमपीसीबी) प्रस्तुत ‘महाएमटीबी पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा बुधवार ९ ऑक्टोबर रोजी नरीमन पॉइंट येतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सायंकाळी ४ वाजता होणार आहे. टीजेएसबी सहकारी बँक, उचित मीडिया आणि मेघा ट्रेडर्स या सहयोगी संस्थांचे संस्थांचे सहकार्य या सोहळ्याला लाभले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी ‘दै. मुंबई तरुण भारत’ आणि ‘महाएमटीबी’ तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील स्पर्धकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत विजयी झालेल्या प्रथम विजेत्याला ५१ हजार रुपये, दुसऱ्या विजेत्याला २५ हजार रुपये, तिसऱ्या विजेत्याला १५ हजार रुपये आणि उत्तेजनार्थ २० विजेत्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन ‘दै. मुंबई तरुण भारत’ आणि ‘महाएमटीबी’ तर्फे करण्यात आले आहे.