_202410071809471399_H@@IGHT_522_W@@IDTH_696.jpg)
ठाणे, दि. ७ : केंद्र सरकारने गृहनिर्माण व नागरी व्यवहार समितीच्या स्थायी समिती सदस्यपदी ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांची नेमणूक केली आहे. समितीमध्ये देशातील शहरी योजना उदा. मेट्रो, स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत योजना, पंतप्रधान आवास योजना, अमृत योजना, परिवहन अशा विविध अर्थसंकल्प आणि शहरी विकास योजनांवर चर्चा करून निर्णय घेतले जातात. समितीची पहिली बैठक समितीचे अध्यक्ष मागुंता श्रीनिवासुलु रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच दिल्लीच्या संसद भवनात झाली. यावेळी शहरी वाहतुकीच्या समस्यांवर मते मांडताना इलेक्ट्रिक बसेससाठी अधिक अनुदान वाढवण्याची गरज व्यक्त केली. तसेच भारतातील नागरी नियोजनाला अधिक परिणामकारक बनवण्यासाठी उत्कृष्ट केंद्रे विकसित करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करणं गरजेचे आहे. ज्यामुळे अशा केंद्रांद्वारे शहरी नियोजन, संशोधन, आणि शिक्षण याला चालना देऊन, शहरांचं दीर्घकालीन आणि शाश्वत विकासाचं उद्दिष्ट साध्य होईल. शहरी भागात जमीन सुधारणांच्या अंमलबजावणीचा आढावा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकासाचं नवीन पर्व उलगडण्यासाठी राष्ट्रीय शहरी डिजिटल मिशनचे पुनरावलोकन व अंमलबजावणी करावी, अशी सूचना खा. म्हस्के यांनी समितीला केली.