अमेठी : उत्तर प्रदेशातील अमेठी येथे एका शिक्षकांच्या कुटुंबीयांच्या हत्येनंतर योगी सरकारने भरपाई म्हणून ३७ लाख रूपयांची भरपाई दिली. त्यापैकी ५ लाख रूपये रोख स्वरूपात देण्यात आले आहेत. त्याबरोबर ३३ लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला. शिवाय मुख्यमंत्री आवास योजनेंतर्गत राहण्यासाठी एक घर आणि जमीन देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली असून सरकारने मदतीचे पाऊल उचलले आहे.
अमेठी येथे सुनील कुमार या शिक्षकाची पत्नी पूनम आणि दोन मुलींच्या हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात वेग आल्यानंतर विरोधकांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला होता. मात्र यावेळी पोलिसांनी आरोपीला अटक केली आली असून याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.