हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने शरद पवार गटात नाराजी! नाराज नेते बंड पुकारणार?

07 Oct 2024 13:23:58
 
Sharad Pawar
 
मुंबई : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश केला आहे. मात्र, त्यांच्या पक्षप्रवेशाने शरद पवार गटातील अनेक नेते नाराज असल्याच्या चर्चा आहे. त्यामुळे हे नेते शरद पवार गटात बंड पुकारण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशाची चर्चा सुरु होती. त्यानंतर त्यांनी सोमवार, ७ ऑक्टोबर रोजी शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील हे इंदापूरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
 
परंतू, हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशामुळे शरद पवार गटातीन काही नेते नाराज असल्याची माहिती पुढे आली आहेत. प्रविण माने, आप्पासाहेब जगदाळे आणि भरत शाह अशी नाराज नेत्यांची नावं आहेत. दरम्यान, भरत शाह यांची नाराजी दूर करण्यासाठी सुप्रिया सुळेंनी त्यांची भेट घेतल्याचीही चर्चा आहे. मात्र, आता हे नाराज नेते पक्षात बंड करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0