चेंबूर आग दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून ५ लाखांची मदत!

06 Oct 2024 17:47:58
mumbai-fire-incident-chembur-siddharth-colony-shop


मुंबई :     मुंबईतील चेंबूर परिसरात लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा मृत्यू झाला. परिसरातील सिध्दार्थ कॉलनीत दुमजली घराला आगीत एकाच कुंटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या अग्निशमन दलाला ही आग विझविण्यात यश आले असून या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. अग्निशमन दलाकडून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.


हे वाचलंत का? -    ...तर अन्नपुर्णा योजनेचा लाभ मिळणार नाही; जाणून घ्या काय आहे कारण


दरम्यान, दुर्घटनास्थळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली असून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या आगीत दोन जणांचा जीव वाचला असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी करत आढावा घेतला आहे. तसेच, जखमींचा उपचार खर्च शासनाामार्फत करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

पालिकेच्या अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, चाळीतील एका दुमजली घराला पहाटे ५.१५च्या दरम्यान आग लागली. या घराच्या तळमजल्यावर एक दुकान होते. या दुकानाच्या इलेक्ट्रिक वायरिंग आणि सामानाला सुरुवातीला आग लागल्याने ही आग पसरत गेली. यात तळमजल्यावर दुकान होते आणि वरच्या मजल्यावर एक कुटुंब राहत होते, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.





Powered By Sangraha 9.0