मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

06 Oct 2024 13:29:02
 
 
 
yuva karya shikshan
योजनेचे उद्धिष्ट - उमेदवारांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे.
 
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरुप -
 
उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) द्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल.
 
योजनेचे ठळक वैशिष्ट्ये -
  • बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवीव व पदवुत्तर, शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार महास्वयम (https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index) संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करू शकतील.,
  • विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प उद्योग/ स्टार्टअप्स, विविध आस्थापना इ. यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदवतील.
  • सुमारे १- लाख कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप)च्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील.
  • सदर कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) चा कालावधी ६ महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल.
  • सदर विद्यावेतन लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात (DBT) जमा करण्यात येईल.
आस्थापना उद्योजकासाठी पात्रता
 
  • आस्थापना / उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा.
  • आस्थापना उद्योगाची स्थापना किमान ३ वर्षांपूर्वीची असावी.
  • आस्थापना उद्योगामध्ये किमान २० मनुष्यबळ कार्यरत असावे.
  • आस्थापना उद्योगांनी EPF, ESIC, GST, Certificate of incorporation , DPIT, व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी.
उमेदवारांची पात्रता
 
  • उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्षे असावे.
  • उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास / आयटीआय / पदविका / पदवीधर / पदव्युततर असावी.
  • उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.
  • उमेदवाराचे आधार नोंदणी असावी.
  • उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे.
  • उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर (https://rojgar.mahaswayam.gov.in/) वर नोंदणी केलेली असावी.
शैक्षणिक अहर्तेप्रमाणे विद्यावेतनाचे विविरण खालील प्रमाणे असेल.
 
अ.क्र. शैक्षणिक अर्हता प्रतिमाह विद्यावेतन
१. १२ वी पास ६०००/-
२. आय.टी.आय / पदविका ८०००/- 
३. पदवीधर / पदव्युत्तर १०,०००/-
 
अधिक माहितीकरता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आकाशवाणी समोर, सावेडी रोड, अहमदनगर या कार्यालयास दुरध्वनी क्र. ०२४१-२९९५७३५ किंवा योजना समन्वयक श्री. वसीमखान पठाण मो.नं. ९४०९५५५४६५ श्री. मच्छिंद्र उकिर्डे मो.नं. ९५९५७२२४२४, श्री. संतोष वाघ मो.नं. ८८३०२१३९७६, श्री. योगेश झांजे मो.नं. ९५८८४०८८९० यांच्याशी संपर्क साधावा.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0