मुंबई : महाराष्ट्र सरकारने अन्नपूर्णा योजनेत बदल केला आहे. लाडकी बहीण योजना व उज्ज्वला योजना या योजनांमधील लाभार्थ्यांच्या नावे गॅस कनेक्शन नसल्याने अनुदान मिळण्यास अडचणी येत आहेत. यामुळे राज्य सरकारने अन्नपूर्णा योजनेत बदल केला आहे. सरकारच्या योजनेतून अनुदान आता थेट अनुदान मिळणार नाही.
दरम्यान, लाभार्थी महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन नसल्याने सरकारला अनुदान देण्यास अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे आता योजनेच्या लाभासाठी गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर हस्तांरित करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या सन २०२४-२५ या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेची घोषणा करण्यात आली होती.
मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलिंडर मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच, केंद्र सरकारने केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या मार्फत देशातील ग्रामीण भागात गॅसजोडणी उपलब्ध करून दिली. त्यानंतर आता राज्य सरकारकडून योजनेत बदल करण्यात आला आहे.