संजौलीच्या अवैध मशिदीप्रकरणी न्यायालयाचा निर्णय

06 Oct 2024 17:35:30

 illegal Masjid
 
शिमला : हिमाचल प्रदेशातील शिमला येथील संजौलीच्या अवैध मशिदीप्रकरणी  (illegal Masjid) तीन मजले पाडण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने मशीद पाडण्यासाठी २ महिन्यांची मुदत दिली आहे. आता याप्रकरणाची सुनावणी २१ डिसेंबरला होणार आहे. मशीद समिती आणि वक्फ बोर्डाने मशिदीचे वरचे तीन मजले आपल्या स्वखर्चाने पाडून घ्यावेत, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. इमारतीच्या उर्वरित काही भागाचा निर्णय घेतला जाईल.
 
 
 
संजौली येथे मशिदीचे बांधकाम सुरू झाल्यानंतर संपूर्ण वाद निर्माण झाला होता. हे विशेष त्यानंतर याप्रकरणी तक्रारी करण्यात आल्याने अवैध बांधकामासंबंधित निर्णय घेण्यात आला आहे.
 
 
 
याप्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, संजौली येथे मशिदीचे बांधकाम २००९ मध्ये सुरू झाले होते. २०२१० सालापासून मशिदीच्या बांधकामावर वाद सुरू झाला. दरम्यान, बेकायदेशीर बांधकाम रोखण्यासाठी महापालिकेकडून एकूण ३८ नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. आता १४ वर्षानंतर याप्रकरणाबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0