श्री समर्थ हनुमान मंडळाची ७० वर्षाची परंपरा

06 Oct 2024 16:32:37

shri samarth hanuman mandal
 
मुंबई : ( Shri Samarth Hanuman Mandal )रंगारी बदक चाळ, काळाचौकी येथील समर्थ हनुमान मंडळातर्फे दरवर्षी नवरात्रौत्सवात मोठया उत्साहात साजरा करण्यात येत असून भक्तांच्या हाकेला धावणारी देवी म्हणून तिची महाराष्ट्रभर ख्याती आहे. या मंडळाने या वर्षी ७० व्या वर्षात पदार्पण केले आहे. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे या मंडळात ७० वर्ष एकच मूर्ती स्थापित केली जात आहे. या मंडळातील मूर्तीचे विसर्जन होत नाही. देवीसाठी तयार केलेल्या विशेष गाभाऱ्यात ती वर्षभर असते आणि नवरात्रीमध्ये तिची मंडळात स्थापना केली जाते. या मंडळाचा संपूर्ण पदभार महिला सांभाळतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंडळात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या वर्षीच्या कार्यक्रमांमध्ये नेत्र तपासणी शिबिर, दुर्गा पाठ पठन, विविध स्पर्धा, शक्ती-तुरा सामना, वेशभूषा स्पर्धा, हळदीकुंकू समारंभ, संगीत खुर्ची, पाककला स्पर्धा, होम मिनिस्टर, वक्तृत्व स्पर्धा, या कार्यक्रमांचा समावेश आहे. दरवर्षी घटस्थापनेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत या मंडळात नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो.
  
“आमच्या मंडळांमध्ये स्त्रियांचा सहभाग अधिक आहे. मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमात स्त्रिया मोठ्या उत्साहाने सहभाग घेतात. दरवर्षी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत आमच्याकडे महिलांसाठी आणि मुलांसाठी अनेक कार्यक्रम होतात ”
 
- छाया दळवी (मंडळाच्या सरचिटणीस)
 
 
Powered By Sangraha 9.0