माजी आमदार सिताराम दळवी यांचे निधन

05 Oct 2024 17:51:21

sitaram dalvi
 
मुंबई : (Sitaram Dalvi) अंधेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सिताराम दळवी यांचे शनिवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी दुपारी वृद्धापकाळाने निधन. ते ८२ वर्षांचे होते.
 
मनसे नेते संदीप दळवी यांचे ते वडील होत. त्‍यांच्‍या पश्‍चात पत्नी शिला, मुलगा संदीप, मुलगी अॅड. प्रतिमा आशिष शेलार, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. १९९५ साली अंधेरी विधानसभा मतदारसंघातून ते शिवसेनेच्‍या तिकीटावर विजयी झाले होते. त्‍यापूर्वी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्‍हणून त्यांनी कामगिरी केली.
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत काम केलेल्या निष्‍ठावान शिवसैनिकांपैकी ते एक होते. शिवेसेनेच्‍या उभरतीच्‍या काळात मुंबई आणि महाराष्‍ट्रात झालेल्‍या पक्षाच्‍या अनेक आंदोलनात त्‍यांचा सहभाग होता. तसेच विविध सामाजिक संघटनांशी त्यांचा निकटचा संबंध होता. सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील आरोस हे त्‍यांचे मूळ गाव. मुंबईतील अंधेरी पूर्व येथे त्‍यांचे अखेरपर्यंत वास्‍तव्‍य होते.
 
Powered By Sangraha 9.0