काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाकडून 'हिट अॅण्ड रन'

05 Oct 2024 17:11:15

ganesh handore
 
मुंबई : (Chandrakant handore) काँग्रेसचे राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलाने 'हिट अॅण्ड रन' केल्याचे समोर आले आहे. चेंबूरच्या आचार्य महाविद्यालयानजीक एका दुचाकीला धडक देत त्याने पलायन केले. त्याच्या कारची धडक बसल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.
 
गणेश हंडोरे असे आरोपीचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ११०, १२५ (अ), (ब), २८१ आणि मोटर वाहन अधिनियमांतर्गत १३४ (अ), (ब), १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवार, दि. ४ ऑक्टोबरच्या रात्री गणेश ज्यूस पिण्यासाठी गोवंडीच्या दिशेने गेला होता. परत येताना चेंबूरच्या आचार्य महाविद्यालय परिसरात त्याने गोपाळ आरोटे नामक दुचाकीस्वाराला धडक दिली आणि तेथून पळ काढला.
 
या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून गणेशला अटक केली आहे. मात्र अचानक शुगर वाढल्याने त्याला जे.जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर, जखमी गोपाळ आरोटेवर झेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गोवंडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0