कोल्हापूरात राहूल गांधींविरोधात भाजप आक्रमक! काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी

05 Oct 2024 12:03:09
 
Rahul Gandhi
 
कोल्हापूर : काँग्रेस नेते राहूल गांधी हे शनिवार, ५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान, कोल्हापूरमध्ये राहूल गांधीविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राहूल गांधींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.
 
राहुल गांधी यांच्या हस्ते आज कोल्हापूरातील कसबा- बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. मात्र, राहूल गांधी सकाळी कोल्हापूरात दाखल झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी सुरु केली.
 
हे वाचलंत का? -  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात! 'असा' असेल दौरा
 
राहूल गांधींनी संविधान आणि आरक्षणसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे भाजपकडून त्यांचा निषेध करण्यात आला. राहूल गांधींनी काँग्रेसच्या एका टेम्पो चालकाच्या घरी भेट दिली. ते कार्यकर्त्याच्या घरी असताना इकडे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरु होते. दरम्यान, आंदोलनस्थळी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून भाजप कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता.
 
 
 
Powered By Sangraha 9.0