पाकिस्तानात हिंदू शेतकरी कुटुंब मृतावस्थेत

05 Oct 2024 15:25:34

Pakistan
 
इस्लामाबाद : पाकिस्तानातील (Pakistan) सिंध येथे एक हिंदू शेतकरी आणि त्याची तीन मुले मृतावस्थेत आढळून आली आहेत. उमरकोट जिल्ह्यातील पल्ली मोरजवळील आंब्याच्या बागेत एका ३२ वर्षाचे एका ३२ वर्षीय शेतकरी, चमन कोल्ही आणि त्याच्या तीन मुलांचे मृतदेह झाडाला लटकलेले आढळले. ८ वर्षांचा भागचंद्र, ६ वर्षांचा हिरो आणि ४ वर्षांची सोनी अशी या मुलांची नावे आहेत. ही घटना ४ ऑक्टोंबर रोजी घडली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोदार फार्म पोलिस ठाणे अंतर्गत आंब्याच्या बागेतील झाडावरून मृतदेह काढून स्थानिक रूग्णालयात पाठवण्यात आले.चमन आणि तिच्या मुलांचे मृतदेह एका झाडाला लटकवल्याचा आढळला होता. पाकिस्तनातील एका प्रसारमाध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, चमन कोल्हीला अर्थिक समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे त्याने आपल्या तीन मुलांना गळफास लावून मारले आणि त्यानंतर त्याने स्वत:ला गळफास लावत आत्महत्या केली आहे. अशातच आता स्थानिक पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
 
 
 
ही घटना सिंधमधील असून हिंदू समाजातील कुटुंबाची दुर्दशा अधोरेखित करण्यात आली. याप्रकरणाची माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आली होती. याप्रकरणी आता सरकारच्या कामगिरीवर खेद व्यक्त केला आहे.
 
Powered By Sangraha 9.0