‘सिंघम अगेन’ परदेशातही गाजवणार डंका, १९७ स्क्रिन्सवर होणार प्रदर्शित!

31 Oct 2024 12:07:49
 
singham again
 
 
मुंबई : रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांनी या चित्रपटाला उचलून धरलं होतं. आता दिवाळीच्या निमित्ताने खास प्रेक्षकांसाठी हा चित्रपट येत असून १ नोव्हेंबर २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आनंदाची बाब म्हणजे ‘सिंघम अगेन’ भारतातच नाही तर आता परदेशातही झळकणार आहे. भारतासह परदेशातही हा चित्रपट प्रदर्शित होणार अशून तब्बल १९७ स्क्रिन्सवर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.
 
रोहित शेट्टी आणि अजय देवगण हे समीकरण फार छान जुळलं आहे. अगदी गोलमाल ते सिंघम हा त्यांच्या प्रवास खरंच प्रेक्षकांना फार आवडला आहे. सिंघम अगेन हा सीक्वेल तब्बल १० वर्षांनी येत आहे. महत्वाचं म्हणजे रोहितच्या या कॉप युनिवर्समध्ये लेडी सिंघम दीपिका पडूकोणची एन्ट्री विशेष लक्ष वेधून घेते.
 
सिंघम अगेनच्या परदेशी प्रदर्शनामध्ये ऑस्ट्रेलिया, फिजी आणि न्यूझीलंड अशा अनेक आंतरराष्ट्रीय देशांचा समावेश आहे. सिंघम अगेन या देशांमध्ये हिंदी भाषेत प्रदर्शित होणार असून आश्चर्याची गोष्ट म्हणजे केवळ ऑस्ट्रेलियातील भारतीयांची मोठी संख्या लक्षात घेता सिंघम अगेन हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रदर्शित होणार आहे.
 
‘सिंघम अगेन’ या चित्रपटात अजय देवगणसह करिना कपूर, जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉफ, अर्जून कपूर, रणवीर सिंह, अक्षय कुमार हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. शिवाय या चित्रपटाची टक्कर भूल भूलैय्या ३ सोबत होणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0