भारतातील प्रमुख उद्योगांचा एकत्रित निर्देशांक(आयसीआय) जाहीर; जाणून घ्या कोणत्या क्षेत्रात सकारात्मक वाढ!

    31-Oct-2024
Total Views |
composite index of major industries in india


मुंबई : 
   देशातील आठ प्रमुख उद्योगांच्या एकत्रित निर्देशांक(आयसीआय)त वाढ झाली आहे. सप्टेंबर २०२३ मधील निर्देशांकाच्या तुलनेत यंदा २.० टक्क्यांनी वाढ नोंदविली आहे. देशातील आठ प्रमुख उद्योगांचा सप्टेंबर महिन्यातील एकत्रित निर्देशांक जाहीर झाला आहे. तसेच, देशातील आठ प्रमुख उद्योगांचा जून २०२४ साठीचा अंतिम वृद्धी दर ५.० टक्के आहे.


हे वाचलंत का? -    सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर शेअर बाजारात घसरण; फंड इंडेक्स उत्तम पर्याय?


दरम्यान, देशातल्या प्रमुख आठ उद्योगांमध्ये सिमेंट, रिफायनरी उत्पादने, कोळसा, पोलाद आणि खतांच्या उत्पादनाने सप्टेंबर २०२४ मध्ये सकारात्मक वाढ नोंदवली आहे. या क्षेत्रांतील वार्षिक आणि मासिक वाढीच्या निर्देशांकाचे आणि वृद्धीदराचे तपशील प्रसृत करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आयसीआयमध्ये देशातील आठ प्रमुख उद्योगांच्या उत्पादनाची एकत्रित आणि वैयक्तिक कामगिरी मोजली जाते.

महत्त्वाचे म्हणजे आठ प्रमुख उद्योग म्हणजे कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि वीज यांचा समावेश करण्यात येतो. औद्योगिक उत्पादन निर्देशांका(आयआयपी)त समाविष्ट केलेल्या वस्तूंपैकी ४०.२७ टक्के वाटा या आठ प्रमुख उद्योगांचा आहे. वर्ष २०२४-२५ मध्ये एप्रिल ते सप्टेंबर या सहामाही कालावधीत आयसीआयचा एकत्रित वृद्धी दर गेल्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत ४.२ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.