Mumbai MVA news : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून नॅरेटीव्ह बांधणीला वेग आला आहे. महायुती सरकारच्या काळात राज्यात महिला सुरक्षित नसल्याचे खोटे नॅरेटीव्ह तयार केले जात आहे. महाराष्ट्रात दररोज सात बलात्काराचे गुन्हे नोंद होतात. दरवर्षी ६४ हजार महिला आणि मुली बेपत्ता होतात, अशी पुस्तिका महाविकास आघाडीने प्रकाशित केली आहे. मात्र, अशाप्रकारची खोटी माहिती देण्याआधी त्यांनी स्वतःच्या घरात डोकावले असते, तर अशी हिंमत केली नसती.
कारण, महाविकास आघाडी सत्तेवर असताना, महिलांवरील अत्याचाराने कळस गाठला होता. त्यांच्या कार्यकाळात लॉकडाऊनमध्येही राज्यात दररोज १0९ महिलांवर अत्याचार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या वर्षात राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांची संख्या तब्बल ३९ हजार, २६६ वर पोहोचली. त्याची सरासरी १0९ घटना प्रतिदिवस इतकी आहे. जानेवारी ते जून २0२२ सालच्या या काळात (महाविकास आघाडी सत्तेवर असेपर्यंत) महिला अत्याचाराच्या एकूण २२ हजार, ८४३ घटना घडल्या. त्याची सरासरी १२६ घटना प्रतिदिवस इतकी आहे. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ने (एनसीआरबी) नुकताच आपला अभ्यास अहवाल सादर केला. त्यातून ही बाब उघडकीस आली. मार्च २0२0 सालामध्ये लॉकडाऊन लागू झाल्यानंतर संपूर्ण देश ठप्प झाला. रस्ते, वाड्या-वस्त्या निर्मनुष्य असताना वर्ष २0२0 मध्ये महाराष्ट्रात ३१ हजार, ७0१ महिलांवर अत्याचार झाले. त्याची सरासरी प्रतिदिन ८८ इतकी आहे. २0२१ सालामध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आले.
५२४ अल्पवयीन मुलींवर अत्याचार
अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रयत्न (पॉक्सो कलम १२, भादंवि ५0९) या श्रेणीतील गुन्हे पाहिले, तर त्यात २0२१ सालापासून अचानक मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. हे गुन्हे २0१७ साली ९४, २0१८ साली ४८, २0१९ साली ९४, २0२0 साली ४८ इतके होते. २0२१ साली ही संख्या २४९ वर पोहोचली. तसेच २0२२ साली ३३२ गुन्ह्यांची नोंद झाली. याकाळात जून २0२२ सालापर्यंत राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडी सरकार होते आणि अनिल देशमुख हे गृहमंत्री होते. मुंबईच्या बाबतीत विचार केला तर, पॉक्सोच्या कलम चार आणि सहा अंतर्गत बलात्काराचे नोंदले गेलेले गुन्हे कमी झालेले आहेत.
लॉकडाऊनच्या काळात सुद्धा मुंबईत २0२0 साली ४४५ बलात्कार झाले. २0२१ सालच्या या वर्षी ५२४ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले. तर, २0२२ साली ही संख्या ६१५ वर गेली. २0२३ साली ती कमी होऊन ५९0 वर आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मुंबईच्या बाबतीत विचार केला तर, पॉक्सोच्या कलम चार आणि सहा अंतर्गत बलात्काराचे नोंदले गेलेले गुन्हे कमी झालेले आहेत. लॉकडाऊनच्या काळात सुद्धा मुंबईत २0२0 साली ४४५ बलात्कार झाले. २0२१ सालच्या या वर्षी ५२४ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले. तर, २0२२ साली ही संख्या ६१५ वर गेली. २0२३ साली ती कमी होऊन ५९0 वर आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
वर्ष महिला अत्याचाराच्या घटना प्रतिदिन (सरासरी)
२0२0 ३१,७0१ (कोविड काळ) ८८ घटना
२0२१ ३९,२६६ (कोविड काळ) १0९ घटना
जानेवारी ते जून २0२२ २२,८४३ १२६ घटना
जुलै ते डिसेंबर २0२२ २0,८३0 ११६ घटना