आणखी एका फूड डिलिव्हरी कंपनीचा आयपीओ येणार; दिग्गजांनी केलीय गुंतवणूक, जाणून घ्या तपशील!

30 Oct 2024 15:48:03
ipo-opening-in-november-price-band


मुंबई :     
देशातील ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी लवकरच बाजारात आयपीओ खुला केला जाणार आहे. दि. ०६ नोव्हेंबर ते ०८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान आयपीओ सबस्क्रिप्शनकरिता खुला होणार आहे. स्विगीने आयपीओ जारी करत भारतीय भांडवली बाजारात आपला प्रवेश निश्चित केला आहे. स्विगी आयपीओच्या माध्यमातून ११,३०० कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. कंपनीत अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित यांच्यासह राहुल द्रविड आणि इतर दिग्गजांनी मोठी गुंतवणूक केली आहे.
 

हे वाचलंत का? -     उद्योगपती गौतम सिंघानिया यांच्या लक्झरी कारमध्ये दोष; कंपनीविरोधात सोशल मीडियावर नाराजी


दरम्यान, कंपनीने ११,३०० कोटी रुपयांच्या आयपीओसाठी प्राईज बँड देखील निश्चित केला आहे. आयपीओसाठी प्रति शेअर ३७१-४९० रुपये प्राईज बँड निश्चित करण्यात आला आहे. आयपीओनंतर स्विगी इंडियाचे मूल्यांकन ११.२ बिलियन डॉलरपर्यंत पोहोचू शकते. कंपनीच्या अहवालानुसार, १७.५ कोटी शेअर्स ऑफर-फॉर-सेलद्वारे विकण्यात येणार आहेत. क्यूआयबी साठी ७५ टक्के, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार आणि १० टक्के हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

विशेष म्हणजे कंपनीने आयपीओसाठी १५ अब्ज डॉलर्सचे मूल्यांकन केले होते. आयपीओ अर्जासाठी किमान लॉट साईज ३८ शेअर्सचा असणार आहे. आयपीओ ६ नोव्हेंबर रोजी खुला होऊन गुंतवणूकदारांना ८ नोव्हेंबरपर्यंत पैसे गुंतवण्याची संधी मिळेल. त्यानंतर आयपीओ दि. १३ नोव्हेंबर रोजी बीएसई आणि एनएसईवर सूचीबध्द होऊ शकतो. फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आपल्या आयपीओद्वारे ११,३०० कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे.




 
Powered By Sangraha 9.0