सलमान खानला पुन्हा धमकी! आरोपींनी केली दोन कोटींची मागणी

30 Oct 2024 11:13:00
 
salman khan
 
 
मुंबई : अभिनेता सलमान खानच्या जीवाला धोका असून वारंवार त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याच प्रकरणामुळे बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली होती आणि त्यानंतर सलमानच्या सुरक्षेत अधिक वाढ देखील करण्यात आली. मात्र, आता पुन्हा एकदा सलमानला धमकी आली असून धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने २ कोटींची मागणी केली आहे.
 
इंडिया टूडेने दिलेल्याच्या रिपोर्टनुसार, एका अज्ञात व्यक्तीने ट्रॅफिक पोलिसांना मॅसेज केला आहे. यामध्ये जर सलमानने २ कोटी रुपयये दिले नाही तर त्याला जीवे मारण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली आहे. दरम्यान, वरळी पोलीस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तीविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे.
 
सलमान खान आणि बिश्नोई गॅंगमध्ये हा वाद १९९८ पासून सुरु आहे. सलमानने काळविटाची शिकार केल्याचा आरोप असल्यामुळे बिश्नोई समाजाच्या तो निशाण्यावरे आहे. कारण, बिश्नोई समाज काळविटाची पूजा करतात. दरम्यान, याच प्रकरणामुळे सलमानच्या बांद्रातील घरावर या एप्रिल महिन्यात गोळीबारही झाला होता. आणि त्यानंतर त्याला जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचे सत्र सुरुच आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0