सलमान खानला पुन्हा धमकी! आरोपींनी केली दोन कोटींची मागणी
30-Oct-2024
Total Views |
मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान अभिनेता सलमान याला काही दिवसांआधी लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच त्याचा जीव वाचवायचा असेल तर लवकरात लवकर २ कोटी रुपये द्यावे असा मेसेज सध्या मुंबई पोलीसांना पाठवण्यात आला आहे.
सलमान खानला धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दरम्यान पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याआधी लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खानला सतत जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे.
अशातच काही दिवसांआधी सलमान खानच्या घरावर लॉरेन्सच्या गँगने गोळीबार केला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते बाब सिद्दिकींनी सलमान खानला सुरक्षा देण्यासाठी लक्ष घातले होते. त्यानंतर आता बाबा सिद्दीकींवर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर आता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
अलीकडेच सलमान खानला धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला उत्तर प्रदेशातील नोएडा येथे पकडण्यात आले होते. आरोपीचे नाव हे तय्यब अन्सारी असे आहे. तय्यब हा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. तो नोएडा येथे सुतार काम करायचा.