पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि सर्वोच्च सैन्याधिकाऱ्यांची दिवाळी सैनिकांसोबत

30 Oct 2024 16:37:10

PM Modi's Diwali
 
नवी दिल्ली (PM Modi Diwali) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच भारताच्या संरक्षण दलांचे सर्वोच्च अधिकारीदेखील देशाच्या सीमावर्ती भागात तैनात सैनिक आणि अधिकाऱ्यांसमवेत दिवाळी साजरी करणार आहेत. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान पोर्ट ब्लेअरमधील अंदमान आणि निकोबार कमांडमध्ये तैनात असलेल्या सैन्यासोबत दिवाळी साजरी करणार आहेत.

 
भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी अरुणाचल प्रदेशात सैनिकांसोबत दिवाळी साजरी करणार असून संरक्षणमंत्र्यांसोबत ते तेथे पोहोचले आहेत. नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी गुजरातमधील पोरबंदर येथे नौदलाच्या तुकड्यांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग जम्मू-काश्मीर सेक्टरमध्ये सैन्यासोबत हा सण साजरा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील सालबादाप्रमाणे यंदाही सीमावर्ती भागा तैनात सैनिकांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत.


Powered By Sangraha 9.0