मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Dhanwantari Puraskar Sohla 2024) धन्वंतरी जयंती तथा आयुर्वेद दिवसनिमित्त मंगळवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी धन्वंतरी पुरस्कार सोहळा ठाणे येथे संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रसिद्ध खगोलतज्ञ दा.कृ.सोमण यांनी सर्व सेवा देणाऱ्या व्यक्तींविषयी कृतज्ञता व्यक्त केली. हे करताना सर्वांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना असणे खूप महत्वाची आहे व चेहऱ्यावर स्मित ठेऊन राष्ट्र प्रथम या भावनेने निरंतर कार्य करत राहावे अशी भावना व्यक्त केली.
हे वाचलंत का? : बांगलादेशात इस्लामिक कट्टरपंथींना युनूस सरकारची 'कायदेशीर ढाल'
सदर पुरस्कार सोहळा आरोग्य भारती (ठाणे), एनआयएमए आयुर्वेद फोरम (ठाणे), टीएमएसडब्लूए (ठाणे), आरोग्यधाम (ठाणे) यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रसिद्ध खगोलतज्ञ दा.कृ.सोमण, उद्योजक प्रशांत संकपाळ व ठाणे महानगरपालिकेच्या एमओएच डॉ. चेतना नितिल यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आरोग्य क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात आले. जिथे वैद्यकीय सेवा पोहोचत नाही अशा दुर्गम भागात जाऊन वैद्यकीय सेवा देणारे डॉ. श्रीकांत नारायण भावे, तसेच मानद स्त्री रोग तज्ञ व मुंबई विद्यापीठातर्फे टिचर ऑफ गाईड व आयुष मंत्रालय भारत सरकारतर्फे रिरोर्स पर्सन म्हणून गौरविण्यात आलेले डॉ विजय लक्षण इनामदार आणि शिवाजी विद्यापीठाचे आयुर्वेद व होमिओपॅथी विभागाचे पूर्व प्राचार्य डॉ एस. आर. जोशी यांना जीवनगौरव देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यासोबतच आरोग्य क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या ८ व्यक्तींना आरोग्य सेवाव्रती हा पुरस्कार तसेच तरुण वयात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना यंग अचिवर्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. श्री गजानन महाराज मेडिकल ट्रस्ट, ठाणे यांचा ही विशेष हेल्थ एम्बॅसेडर ऑरगनायझेशन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.