महाराष्ट्रातील सर्वात विशाल डोंबिवलीतील नमो रमो नवरात्री गरबा

03 Oct 2024 18:51:12
 
namo ramo garba
 
डोंबिवली, दि . २ : (Namo Ramo Navratri Garba) गेल्या सात वर्षांपासून डोंबिवलीतील ह. भ. प. सावळाराम क्रीडा संकुलात राज्याचे विद्यमान सार्वजानिक बांधकाम मंत्री तथा डोंबिवलीचे लोकप्रिय आमदार रविंद्र चव्हाण राज्यातील सर्वात मोठा आणि विशाल गरबा उत्सव म्हणुन नावारूपास आलेला नमो रमो नवरात्री गरबा नाईटस् अणि नमो रमो रमजट हा भव्य उत्सव आयोजित करतात. गेल्या सात वर्षांपासून हा उत्सव डोंबिवलीमध्ये आनंदाचे आणि एकात्मतेचे प्रतीक बनला आहे.
 
यंदा ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर नमो रमो गरबा तर १५ अणि १६ ऑक्टोबर रोजी नमो नमो रमजट शरद पौर्णिमा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यामध्ये सणाची धार्मिक परंपरा कायम राखली जाते हे खास वैशिष्ट्य.
 
या वर्षी सोहळ्याचे आठवे वर्ष असून बाराहून अधिक लोकप्रिय कलाकार अणि सुमारे ४८ हजार लोकांचा सहभाग असणार आहे. गीताबेन रबारी या प्रमुख गायिकेसह निलेश गढवी, केतन पटेल अणि आसिफ सोरठीया यांचा सिंफनी बँड गरबा चे खास आकर्षण असणार आहे. तसेच नमो रमो रमजट साठी बॉलिवूड गायिका यशिता शर्मा, अंबर देसाई, अलका मंदाकिनी यांचा सहभाग असणार आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे कलावंत या गरबा सोहळ्यास हजेरी लावणार आहेत.
 
या विशाल गरबा सोहळ्यासाठी संपूर्णपणे वातानुकूलित डोम मंडप उभारण्यात आला असुन त्याची आकर्षक सजावट करण्यासाठी खास सेट डिझाईन करण्यात आला आहे. याच्या जोडीला प्रसिद्ध लोकगायक, अत्याधुनिक ध्वनी आणि विद्युत प्रणाली, व्यावसायिक सुरक्षा व्यवस्था , फोटोग्राफर अणि कॅमेरा टीम उपस्थित असणार आहे. सुरक्षेच्या कारणस्तव येथे प्राथमिक आरोग्य चिकित्सा सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आकर्षक बक्षिसे देखील देण्यात येणार आहेत. डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार या कार्यक्रमाची सहयोगी संस्था आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0