भारतात दहशतवादाला स्थान नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी

03 Oct 2024 20:27:30
 
Narendra Modi
 
नवी दिल्ली : इस्त्रायल-लेबनॉन येथे तणावादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) सोमवारी ३० सप्टेंबर रोजी इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. यासंबंधित त्यांनी स्वत: सोशल मीडियावर माहिती दिली आहे. इस्रायल-लेबनॉन तणावादरम्यान भारतात दहशतवादाला स्थान नाही असे मोदी म्हणाले. आंतरराष्ट्रीय पातळीवर तणावाची परिस्थिती असताना त्यांनी केलेल्या वक्तव्याची जागतिक पातळीवर चर्चा आहे. 
 
देशात शांतता आणि स्थिरता निर्माण व्हावी यासाठी भारत देश हा वचनबद्ध आहे. सध्या जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशाच परिस्थितीत हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाला ठार मारले गेले. तसेच हिजबुल्लाहची एक दोन नव्हे तर ८०० लोकं मारली गेली आहेत. याचपार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले वक्तव्य हे आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधून घेणारे आहे.
 
सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्धजन्य परिस्थिती असताना दोन्ही नेत्यांमध्ये ४५ दिवसांत दुसऱ्यांदा फोनवरून संभाषण झाले. यापूर्वी मोदींनी इस्त्रायलच्या पंतप्रधानांना हमाससोबतचे युद्ध वाटाघाटी करण्यास सांगितले होते. यासोबत युद्धविराम करण्याबाबतही सांगितले.
 
Powered By Sangraha 9.0