कल्याणात निमा वेद ग्लॅम 2024 आणि आनंदी राष्ट्रीय वैद्यकीय परिषद संपन्न

03 Oct 2024 19:09:06
 

spradha photo 
कल्याण : कल्याणमध्ये वूमेन्स फोरम निमा कल्याण यांच्यातर्फे 'निमा वेदा ग्लॅम 2024' ब्रेन अॅण्ड ब्युटी काॅन्टेस्ट ही महिला डॉक्टरांची सौंदर्य स्पर्धा आणि "आनंदी" ही राष्ट्रीय वैद्यकिय शिक्षण परिषद अतिशय यशस्वीरित्या संपन्न झाली.
भारतीय चिकित्सा पद्धती (आयएसएम) च्या पद‌वीधरांची सर्वात मोठी संघटना असलेल्या निमा - नॅशनल इंटिग्रेटेड मेडीकल असोसिएशनच्या कल्याण शाखा तसेच निमा वुमेन्स फोरमने या सौंदर्य स्पर्धा आणि राष्ट्रीय परिषदेचे यजमानपद भूषवले.
सौंदर्य स्पर्धेत उत्तराखंड ते कर्नाटकमधील महिला डॉक्टर...
कल्याणात प्रथमच झालेल्या या महिला डॉक्टरांच्या सौंदर्य स्पर्धेमध्ये देशाच्या उत्तराखंड ते कर्नाटक अशा विविध राज्यांतील 35 महिला डॉक्टरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याचे दिसून आले. विविध पेहराव, आभुषणे, कॅटवॉक, कलागुण सादरीकरण, सामाजिक बांधिलकीत स्वतःची ओळख आणि बौद्धिक क्षमतेचा कस लावणारे विविध प्रश्न अशा विभिन्न फेऱ्यानंतर विजेत्यांची निवड करण्यात आली.
रॉयल ग्रुपमध्ये मिरा-भाईंदरची डॉ. अपूर्वा रंगारी विजेती तर जबलपुरची डॉ. तलन फिरदौस उपविजेती ठरली. क्लासिक ग्रुपमध्ये हरयाणाच्या डॉ. रश्मि शर्मा विजेत्या ठरल्या तर कल्याणच्या डॉ.आम्रपाली परांजपे आणि व सोलापूरच्या डॉ. सारिका होमकर या दोघीही अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय उपविजेत्या ठरल्या. या स्पर्धेसाठी वुमेन्स फोरमच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. साधना कुलकर्णी यांनी प्रमुख अतिथी आणि डॉ. वैशाली पडघन या अध्यक्षपद भूषविले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0