वसईमधून शक्तीप्रदर्शन करत भाजपाकडून स्नेहा दुबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

    29-Oct-2024
Total Views |
vasai constituency bjp sneha dube

 
खानिवडे :     वसई विधानसभा मतदारसंघात यंदा तीन नेत्यांमध्ये मुख्य लढत होणार आहे. वसईमधून भाजपने स्नेहा दुबे यांना उमेदवारी दिली आहे. बहुजन विकास आघाडी कडून विद्यमान आमदार हितेंद्र ठाकूर हे पुन्हा एकदा रिंगणात आहेत . तर काँग्रेस कडून विजय पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने यंदा वसई विधासभेट रंगतदार लढत होण्याची चिन्हे आहेत. मात्र,  वसईकर जनता कोणाच्या पारड्यात मतदान करते हे 23 नोव्हेंबरलाच कळणार आहे. वसई विधानसभा मतदारसंघातून 2009 च्या निवडणुकीत विवेक पंडीत यांनी अपक्ष निवडणूक लढवून विजय मिळवला होता. त्यांनी बविआच्या नारायण मानकर यांना पराभूत केले होते. त्यांच्याच कन्या स्नेहा दुबे यंदा वसईत उभ्या राहिल्या आहेत. त्यांनी जोरदार शक्तीप्र्रदर्शन करत मंगळवारी उमेदवारी अर्ज भरला.
 
2008 नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, वसई मतदारसंघात आगाशी, वसई, माणिकपूर ही महसूल मंडळे , नवघर माणिकपूर नगरपालिका, वसई नगरपालिका आणि सन डोअर सीटी यांचा समावेश करण्यात आला होता . महायुतीच्या नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो मोठ्या मतांनी निवडून येऊन मी सार्थ करून दाखवेन .तसेच वसईच्या मूलभूत सुविधांचा असलेल्या अभावाला आवाज देण्याकरिता मी कटिबद्ध असेन असे यावेळी बोलताना स्नेहा दुबे यांनी आपले मत व्यक्त केले. ‘केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र‌’ हे आमचे स्वप्न आहे. वसईकर जनतेने प्रत्येकवेळी कमळावर प्रेम केले आहे लोकसभेनंतर पुन्हा वसईकर जनता कमळावर विश्वास दाखवेल हे आजच्या रॅलीतून स्पष्ट होते असे अनेक कार्यकर्ते यावेळी बोलून दाखवत होते.