देशभरातील वयोवृध्दांना मोदी सरकारची दिवाळी भेट; वाचा सविस्तर

    29-Oct-2024
Total Views |
modi govt senior citizens


मुंबई : 
     आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत योजनेबाबत मोठी घोषणा केली असून देशभरातील ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी आयुष्मान योजनाचा नवीन टप्पा आयुष्मान भारत “निरामयम” योजना सुरु केली असून ७० वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तींना योजनेचा लाभ मिळणार आहे.




दरम्यान, दिल्ली येथील ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद(एआयआयए) आयोजित कार्यक्रमात १२ हजार ८५० कोटींची योजना लागू करण्याची घोषणा केली. दिवाळी सणाच्या मुहूर्तावर देशातील वयोवृध्दांना मोठी भेट मिळाली असून दरवर्षी पाच लाखांपर्यंतच्या विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात.

महत्त्वाचे म्हणजे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत ७० वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींना या लाभाकरिता उत्पन्नाची कुठलीही अट नाही. तसेच, कुठल्याही उत्पन्न गटातील व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेत वृध्द व्यक्तींना आयुष्मान कार्ड दिले जाणार असून स्पेशल कार्ड २९ ऑक्टोबरपासून मिळणार आहे. त्यासाठी वृद्धांना त्यांचे आधार कार्ड आणि केवायसी देखील अपडेट करावे लागणार आहे.